जळगाव समाचार डेस्क| २९ जुलै २०२४
दि. २२ मे २०२४ रोजी कालींका माता मंदिर परिसरातील हॉटेल भानू समोर रात्री १०.०० ते १०.३० वा.चे सुमारास जुन्या वादातून किशोर अशोक सोनवणे, रा. कोळीपेठ जळगाव याचा काही तरुणांनी धारदार शस्त्र, लाकडी काठ्या दांडे याने मारहाण करून त्याचा खून झाला होता. त्यानुसार शनिपेठ पो, स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील आता फरारी असलेले दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यापूर्वी सदर गुन्ह्यातील ७ आरोपीतांना अटक करण्यात आली होती. दरम्यान त्यातील मुख्य आरोपी निलु आबा उर्फ निलेश सपकाळे व अमोल छगन कोळी रा. जळगाव यांना आता अटक केली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा जळगाव येथे गुप्त माहिती प्राप्त झाल्यानुसार एक पथक तयार करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील स्थानिक पोलिसांच्या साथीने नाव बदलून वास्तव्य करणाऱ्या मुख्य आरोपी पर्यंत पोहोचले. आणि त्यांना तत्काळ अटक केली.
सदरची कारवाई डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव यांचे मार्गदर्शनाखाली, बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक राहुल तायडे, स.फौ विजयसिंग पाटील, स.फौ युनूस शेख, पो.कॉ सुनिल दामोदरे, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, लक्ष्मण पाटील, ईश्वर पाटील यांनी केली.

![]()




