जळगाव समाचार डेस्क;
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना कुटुंब नायक उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काल पिंप्राळा येथे छत्री,टी-शर्ट आणि शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. जळगाव शहराचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या संकल्पनेतून सदर कार्यक्रमाचे भव्य आयोजन पिंप्राळा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथी संपर्क कार्यालयाजवळ करण्यात आले होते.(Jalgaon)
जळगाव शहराच्या विविध भागामध्ये १० हजार छत्री व टीशर्ट वाटपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. सोबतच युवासेना व के.पी.फाउंडेशन च्या माध्यमातून शालेय विद्यार्थी यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे.
यावेळी सर्वांनी मा. उद्धव साहेब ठाकरे यांनी दीर्घायुष्य साठी शुभेच्छा दिल्या आणि लवकर महाराष्ट्र राज्यचे मुख्यमंत्री पुन्हा होणार अश्या शुभेच्छा दिल्या वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख यांनी दिल्या २०% राजकारण आणि ८० %समजा कारण या हेतू डोळ्यासमोर ठेवून या उपक्रमाचे नियोजन केल्या असल्याचे कुलभूषण पाटील यांनी सांगितले आणि असेच सामाजिक कार्य जळगाव च्या जनते साठी करणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमावेळी माजी महापौर सौ.जयश्री महाजन, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, युवासेना युवा अधिकारी पियुष गांधी, विधानसभा सभा क्षेत्र युवा अधिकारी अमित जगताप, युवासेना महानगर युवा अधिकारी यश सपकाळे, महिला आघाडीच्या सौ.निलू इंगळे, सौ.मनीषा पाटील, सौ.जया तिवारी यांच्यासह शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

![]()




