जळगाव समाचार डेस्क| २७ जुलै २०२४
कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये हृदयद्रावक हत्येचा व्हिडिओ समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वी बेंगळुरूमधील कोरमंगला येथील ‘पेइंग गेस्ट’ रुममध्ये गळा चिरून हत्या करण्यात आलेल्या मुलीच्या हत्येशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. यामध्ये एक तरुण तरुणीवर चाकूने हल्ला करताना दिसत आहे. (Murder)
मुलगी बिहारची होती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 जुलैच्या रात्री मुलीची हत्या करण्यात आली होती. हल्लेखोराने खोलीत घुसून 24 वर्षीय कृती कुमारीची हत्या केली. या प्रकरणाची माहिती देताना पोलीस आयुक्त बी दयानंद म्हणाले की, कृती कुमारी बिहारची रहिवासी होती. ती शहरातील एका खासगी कंपनीत कामाला होती.
मारेकरी मध्य प्रदेशातील आहे
पोलिस अधिकारी दयानंद यांनी सांगितले की, मारेकऱ्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. मारेकऱ्याला पकडण्यासाठी तीन विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. मारेकरी मध्य प्रदेशातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळेच त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक मध्य प्रदेशातही रवाना झाले आहे.
पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळाले
सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हा व्हिडिओ कोरमंगला घटनेचा सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती पॉलिथिन बॅग घेऊन ‘पेइंग गेस्ट’ रूममध्ये प्रवेश करत आहे. तो दार ठोठावतो. काही वेळाने तो मुलीला ओढून बाहेर काढताना दिसतो. यादरम्यान, पीडितेने हल्ल्याचा विरोध केला, परंतु मारेकरी तिला पकडतो, तिचा गळा कापतो आणि तेथून पळून जातो. आवाज ऐकून इमारतीत उपस्थित असलेल्या इतर मुली घटनास्थळी पोहोचतात मात्र तिला ते वाचवू शकत नाहीत. चाकूच्या हल्ल्यांनंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कृती कुमारीचा जागीच मृत्यू झाला.

![]()




