आकाशवाणी चौकात भीषण अपघात; दुचाकीस्वार ठार…

 

जळगाव समाचार डेस्क;

जळगाव (Jalgaon) शहरात अपघाताची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. सध्या पावसामुळे नवीन बनलेल्या रस्त्यांची दुरवस्था होत असतांना अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. त्यात आकाशवाणी चौकात फ्लायओव्हर किंवा सिग्नल यंत्रणा नसल्याने एका भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास घडली आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, शहरातील मुख्य चौफुली पैकी एक असणाऱ्या आकाशवाणी चौकात एका भरधाव ट्रकने एका दुचाकीला दिलेल्या धडकेत अनोळखी इसमाचा मृत्यू झाला आहे. हा अनोळखी इसम दुचाकी क्रमांक (MH 19 BD 2752) ने महाबळकडून जळगाव शहराकडे जात होता यादरम्यान पाळधीकडून भुसावळकडे जाणाऱ्या भरधाव (RJ 11 GB 7642) ट्रकने दुचाकीला धडक दिली होती. यावेळी जिल्हापेठ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून ट्रक ताब्यात घेतला आहे. तर खासगी वाहनाने मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला आहे. अद्याप मयताची ओळख पटलेली नाही. नातेवाईकांनी ओळख पटवावी असे आवाहन पोलीसांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here