जळगाव समाचार डेस्क| २४ जुलै २०२४
रावेर येथे अवैधरित्या गुरांची वाहतूक करणाऱ्या ट्रक ला पोलिसांना पकडण्यात यश आले आहे. पाल फाट्यावर रावेर पोलिसांनी बजावली कामगिरी, यावेळी चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, खरगोन मध्यप्रदेश येथून गुरांचा अवैधरित्या कंटेनर भरुन पाल मार्गे जाणार असल्याची गुप्त माहीती पोलीस निरिक्षक डॉ विशाल जयस्वाल यांना प्राप्त झाली. त्यानुसार त्यांनी आपले एक पथक तयार करून पाल फाट्याजवळ वाहनांची तपासणी सुरु केली. यावेळी तपासणी दरम्यान सकाळी 07.30 वा. सुमारास एक अशोक लेयलॅण्ड कंपनीचा कंटनेर क्र.KA.01.AN.5028 सदर कंटेनर थांबवून कंटनेर चालकास विचारपूस केली असता, तो उडवाउडवीचे उत्तर देऊ लागला. त्याच्या कंटेनरची तपासणी केली असता, त्यात 2 ते 3 वयाचे तब्बल 52 म्हशींचे पारडे दोरीने दाटी वाटीने कोंबुन त्यांना दोरखंडाने जखडून ठेवुन वाहतुक करतांना आढळले. यावेळी चालक मोहम्मद बिलाल अयुब, (29), रा. हिंम्मत पट्टी गाव रिठट, फिरोजपुर जि. नुह राज्य हरीयाणा.
त्याच्या विरुध्द रावेर पोलीस स्टेशन येथे सीसीटीएनस गुरन 334/2024 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कायदा कलम 6, 9 (अ), महाराष्ट्र पशु क्रूरता अधिनीयम कलम 11 चे (1), (D), (F), (K). (E), प्राण्याचे वाहतुक अधिनीयम 47,48,49, महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम 119, मोटार वाहन कायदा कलम 83/177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पकडलेली गुरे सध्या द्वारका गोशाळा येथे ठेवण्यात आली आहेत. सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस निरीक्षक श्री, डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप. निरी. घनश्याम तांबे हे करीत आहे.
यांनी बजावली कामगिरी…
पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक जळगांव अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधिक्षक फैजपुर. अन्नपूर्णा सिंह, पो.नि डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली, पो.उप.निरी.घनश्याम तांबे, पो.कॉ. प्रमोद पाटील, पो.कॉ. राहुल परदेशी, पो.कॉ. विशाल पाटील, पो. की. महेश मोगरे, पो.कॉ. सचिन घुगे, पो.कॉ रुवात तडवी यांच्या पथकाने कार्यवाई केली आहे.

![]()




