मा.आ. कृषिभूषण पाटलांच्या घराच्या प्रवेशद्वारावर तुतारी वाजविणारा माणूस…

 

अमळनेर प्रतिनिधी, जळगाव समाचार डेस्क;

राज्यात विधानसभा निवडणुका जरी अजून तीन महिन्यांवर असल्या तरी अनेकांनी आपापल्यापरीने प्रचाराला सुरुवात केली आहे. याचाच प्रत्यय माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी अमळनेर शहरातील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे चिन्ह (तुतारी वाजविणारा माणूस) आपल्या राजभवन या घराच्या प्रवेशद्वारावर लावून एक प्रकारे प्रचाराला सुरुवात केली आहे.
यावेळी त्यांनी प्रचाराच्या बॅनरवर स्वतःचा फोटो देखील वापरला नाही. शरद पवारांनी आपले आयुष्य शेतकरी व कष्टकरी जनतेसाठी वेचले असून यातून उतराई होण्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचा प्रचार करणार आहे असे कृषिभूषण यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here