SBI ते आर आर विद्यालय वन वे असूनही बेशिस्त वाहतुक; विद्यार्थी आणि रुग्णांचे हाल…

 

जळगाव समाचार डेस्क;

कधीकाळी जळगाव (Jalgaon) शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून आर आर विद्यालयाकडे जाणारा रस्ता हा वन वे होता. तेथून कोणत्याही वाहनास जाण्यास परवानगी नव्हती, एवढच काय तेथे ट्रॅफिक पोलीस देखील बंदोबस्तासाठी उभे असायचे. मात्र आता सर्रासपणे येथून सर्वप्रकारचे वाहनांची वाहतूक होते. आणि तीही बेशिस्त पद्धतीने… प्रशासन नक्की कोणत्या मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का?
व्हिडीओ लिंक

या रस्त्याला लागून अनेक शाळा, हॉस्पिटल आहेत. सोबत येथे गुरुद्वारा साहेब सुद्धा आहे. मात्र याचे भानही चालकांना येथून प्रवास करतांना नसते. आधी नो एन्ट्री मध्ये दंड आकारणीसाठी का असेना ट्रॅफिक पोलीस उभे असायचे मात्र गेली अनेक वर्षांपासून त्यांचा थांगपत्ता लागत नाही. या अश्या बेशिस्त वाहतुकीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे आणि त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचे, रुग्णालयातील रुग्णांचे ध्वनी प्रदूषणाने नक्कीच हाल होत असतील यात तिळमात्र शंका नाही. याकडे प्रशासनाने आतातरी लक्ष घालावे अश्या चर्चा येथील व्यापारी वर्गातून होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here