(विक्रम लालवणी), प्रतिनिधी पारोळा
पारोळा येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या वतीने दि. २२ जुलै रोजी महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या ६५ व्या जन्मदिवसानिमित्त डॉ. संभाजीराजे आर पाटील यांच्या वतीने पारोळा कुटीर रुग्णालय व श्री साई हॉस्पीटल येथील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते डॉ. संभाजीराजे आर पाटील, एरंडोल पारोळा विधानसभा क्षेत्र प्रमुख डॉ.महेश पवार यांच्यासह,डॉ. संभाजीराजे पाटील फाउंडेशनचे सदस्य व नागरिक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

![]()




