गुलाबराव विरुद्ध गुलाबराव लढतीवर शिक्कामोर्तब; तर राष्ट्रवादीत इच्छुकांच्या अपेक्षा शिगेला…

 

जळगाव समाचार डेस्क;

लोकसभा निवडणुकीत जळगाव (Jalgaon) जिल्यातील दोन्ही जागा हरल्यानंतर महाविकास आघाडी आपापल्यापरीने जिल्हा पिंजून काढून विधानसभेसाठी मतदारसंघात मशागत करताना दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर काल राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा जिल्हा मेळावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधून कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार दिला पाहिजे यावर त्यांची मते जाणून घेतली. दरम्यान यावेळी जळगाव ग्रामीण मतदारसंघात दोन्ही गुलाबराव आमनेसामने येतील यावर शिक्कामोर्तब झाले. माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर हे आपल्या पारंपारिक मतदारसंघातून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरुद्ध आपले दंड थोपटणार आहेत. त्याच प्रमाणे पारोळा-एरंडोलमधून माजी मंत्री डॉ.सतीश पाटील यांनाही उमेदवारीसाठी पाठींबा मिळाला, त्यांचीही उमेदवारी निश्चित झाली.
यावेळी जयंत पाटील यांनी म्हटले कि, आघाडी धर्म राखून आपल्याला मित्रपक्षांचाही तेवढाच विचार करावा लागणार असून, सर्वांच्या साथीने पुढे जाऊन आपण राज्यात महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहोत.
इच्छुकांच्या अपेक्षा शिगेला…
दरम्यान अनेक इच्छुकांनी आपली या विधानसभेत निवडणूक लढण्याची तयारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समोर दर्शवली आहे.
विकास पवार, मंगला पाटील, अशोक लाडवंजारी – जळगाव शहर
डॉ.चंद्रकांत बारेला, ज्योती पावरा, डी.पी.साळुंखे – चोपडा
माजी आमदार साहेबराव पाटील, डॉ.बी.एस.पाटील, तिलोत्तमा व गिरीश निकम – अमळनेर
माजी आमदार राजीव देशमुख – चाळीसगाव
डी.के.पाटील, प्रशांत पाटील – जामनेर
माजी आमदार दिलीप वाघ – पाचोरा
माजी आमदार अरूण पाटील – रावेर
स्वाती भामरे – भुसावळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here