जळगाव समाचार डेस्क;
आषाढी नंतर घराकडे परतणाऱ्या वारकऱ्यांची गाडी थेट विहिरीत जाऊन पडल्याने 7 जणांचा मृत्यू झाल्याची घटना जालना ते राजूर रोडवरील तुपेवाडी फाट्याजवळ घडली आहे.
या घटनेत विहिरीतून ७ प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. यात सुदैवाने तीन जण बचावले असून, त्यांना जालना येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना दि.१८ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता घडली.