जळगाव समाचार डेस्क;
चंदीगडहून दिब्रुगडला जाणाऱ्या दिब्रुगड एक्स्प्रेसचा उत्तर प्रदेशातील गोंडा येथे रेल्वे अपघात झाल्याचे वृत्त आहे. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यावेळी अनेक प्रवासी घसरलेल्या डब्यांमध्ये अडकलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी शर्थीने बचावकार्य सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात ट्रेनच्या एसी कोचचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेत अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत.
या अपघाताबाबत रेल्वेकडून निवेदन जारी करण्यात आले आहे. निवेदनानुसार, चंदीगड-दिब्रूगड एक्स्प्रेस (159904) दुपारी 2.37 वाजता अपघाताची शिकार झाली. ही गाडी गोंडाहून दुपारी दोन वाजता सुटली. सुमारे 27 किमी अंतर कापल्यानंतर, झिलाही स्थानकापासून 4 किमी पुढे ट्रेन रुळावरून घसरली. चार ते पाच डबे रुळावरून घसरले आहेत.
गोंडा शहरापासून 27 किलोमीटर अंतरावर ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान घटनास्थळी स्थानिक लोक मदत आणि बचाव कार्य करत आहेत. घटनास्थळी बचाव पथके रवाना करण्यात आले असून, रेल्वेचे वैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचले आहे.