जळगाव समाचार डेस्क;
स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी लहान माऊलींसाठी बोलावा विठ्ठल या कार्यक्रमाचा आयोजन गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या कार्यक्रमाचे आयोजन कांताई सभागृह जळगाव (Jalgaon) येथे बुधवार दिनांक १७ जुलै रोजी ठीक संध्याकाळी ६.३० वाजता करण्यात आलेले आहे.
कार्यक्रम या कार्यक्रमात अनुभूती स्कूल, ए.टी. झांबरे विद्यालय, विवेकानंद प्रतिष्ठान, सेंट जोसेफ स्कूल, व ओरियल सीबीएससी स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. या कार्यक्रमात संध्याकाळी ६ वाजता छोटेखानी वारीचे आयोजन करण्यात आले असून वारीत विविध खेळ सादर होणार आहेत. या सोबतच प्रभाकर कला संगीत अकादमी च्या विद्यार्थिनी दोन अभंगावर कथक नृत्याची प्रस्तुती करणार आहेत. यासोबतच कार्यक्रमात जळगावचे दोन तरुण गायक वरूण नेवे व ऐश्वर्या परदेशी हेही सहभागी झालेले आहेत. तबल्याची संगत सर्वेश चौक तर संवादिनीची साथ शौनक दीक्षित व भूषण खैरनार हे करणार आहेत.
कार्यक्रमाची यशस्वीतासाठी नुपूर चांदोरकर- खटावकर, वरूण देशपांडे, स्निग्धा कुलकर्णी, जुईली कलभंडे यांनी परिश्रम घेतले आहेत. छोट्या मुलांची अर्थात छोट्या माऊलींची ही कला पाहण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तमाम जळगावकर रसिकांना चांदोरकर प्रतिष्ठान व भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशन तर्फे आवाहन करण्यात आले आहे की या कार्यक्रमास त्यांनी जरूर उपस्थिती द्यावी व लहान माऊलींचा उत्साह वाढवावा.