Monday, December 23, 2024
Homeजळगाव ग्रामीणआषाढी एकादशी निम्मित कल्पना फाउंडेशन व गोदावरी फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने भव्य...

आषाढी एकादशी निम्मित कल्पना फाउंडेशन व गोदावरी फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबीर…

जळगाव समाचार डेस्क;

आषाढी एकादशी निमित्ताने कल्पना फाउंडेशन व गोदावरी फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबीर तसेच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दि. 17 जुलै बुधवार रोजी एरंडोल येथे करण्यात आले आहे.
आरोग्य शिबिरात मोफत ECG,कार्डीओग्राफ, रक्तदाब तपासणी, यासह हृदयाशी संबधित आजारांची तसेच अनेक बाबींची तपासणी करण्यात येणार असून या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
दि. 17 जुलै बुधवार रोजी सकाळी 10 वा. रा.ति काबरे विद्यालय, नविन पोलीस स्टेशन जवळ, एरंडोल येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती स्वप्नील पाटील यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page