(विक्रम लालवाणी) प्रतिनिधी पारोळा
पारोळ्यातील बालाजी मंदिरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा शहरातील जागृत दैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या बालाजी मंदिरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने दि.१७/७/२०२४ बुधवार रोजी सकाळी ११ ते १२ वाजेच्या दरम्यान सव्वालक्ष तुळशीपत्रे वाहण्याच्या कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री बालाजी संस्थान, महाप्रसाद समिती व विश्वस्त मंडळ ,बालाजी स्वयंसेवक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.