Monday, December 23, 2024
Homeजळगावखुल्या बुद्धिबळ निवड स्पर्धेत १२० खेळाडू सहभागी; गुणवंत कासार प्रथम तर तसीन...

खुल्या बुद्धिबळ निवड स्पर्धेत १२० खेळाडू सहभागी; गुणवंत कासार प्रथम तर तसीन तडवी द्वितीय…

 

जळगाव समाचार डेस्क;

जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यातर्फे खुल्या बुद्धिबळ निवड स्पर्धेचे आयोजन कांताई सभागृह येथे (ता. १४) जुलै ला सकाळी १०.०० वाजता करण्यात आले होते. या स्पर्धेत पहिल्या चार विजेत्या खेळाडूंची निवड झाली. (Jalgaon)

जळगाव येथे २५ ते २८ जुलै २०२४ कालावधीत होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी जिल्हा संघात या खेळाडूंची निवड झाली. राज्य स्पर्धेतून महाराष्ट्रातील चार खेळाडूंची निवड हरियाणा मधे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी होईल. अत्यंत चुरशीच्या वातावरणात खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत गुणवंत कासार प्रथम, तसीन तडवी द्वितीय, प्रशांत कासार तृतीय, अजय परदेशी चतुर्थ यांची निवड झाली. जिल्ह्यातील एकूण १२० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण ठाकरे यांच्या मार्गदर्शनात फीडे आरबीटर अभिषेक जाधव, सीनिअर अर्बिटर परेश देशपांडे, नॅशनल अर्बिटर नथू सोमवंशी, फीडे अर्बिटर आकाश धनगर यांनी स्पर्धेचे पंच म्हणून काम केले. शकील देशपांडे, रवी दशपुत्रे, तेजस तायडे यांनी खेळाडूंचा उत्साह वाढविला. नंदलाल गादिया, अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूना पारितोषिके देण्यात आलीत. चंद्रशेखर देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. दि.२५ ते २८ जुलै २०२४ जळगाव येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंव्यतिरिक्त अधिकाधिक संख्येने सहभागी होण्यासाठी आवाहन केले.

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page