उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाला – शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद…

 

जळगाव समाचार डेस्क;

ज्योतिर्मठचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठं वक्तव्य केलं आहे. अविमुक्तेश्वरानंद सरस्वती सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील मातोश्रीवर पोहोचले. माजी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर ते म्हणाले की, महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाला आहे. त्यांना पुन्हा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावर बसलेले बघायचे आहे. ते म्हणाले खरे हिंदुत्व कोणाचे? ज्याचा विश्वासघात झाला तो खरा हिंदू आहे हे जाणून घ्या. ज्याने जगाचा विश्वासघात केला तो खरा हिंदू नाही.
ते पुन्हा मुख्यमंत्री झाल्याशिवाय दु:ख दूर होणार नाही.
शंकराचार्य म्हणाले, ‘आम्ही हिंदू धर्म मानतो. आम्ही ‘पुण्य’ आणि ‘पाप’ मानतो. ‘विश्वासघात’ हे सर्वात मोठे पाप म्हटले जाते. हेच उद्धव ठाकरेंच्या बाबतीत घडले आहे. त्यांनी मला बोलावलं आणि मी इथे आलो. उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले आहे. त्यांचा विश्वासघात झाला आहे. याचे आम्हाला दु:ख झाले आहे. जोपर्यंत ते पुन्हा मुख्यमंत्री होत नाहीत तोपर्यंत आमचे दु:ख दूर होणार नाही.
केदारनाथमध्ये 228 किलो सोन्याचा घोटाळा….
दिल्लीत केदारनाथ धाम बांधण्याच्या प्रश्नावर स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, ‘प्रतिकात्मक केदारनाथ बांधता येणार नाही. बारा ज्योतिर्लिंगे विहित आहेत. त्याची जागा निश्चित आहे. हे चुकीचे आहे. पुराणात म्हंटले आहे ‘केदारम हिम पृष्ठे…’ मग त्याला दिल्लीला कसे नेणार?’ ते म्हणाले, आमच्या मंदिरात राजकारणी येत आहेत. केदारनाथमध्ये २२८ किलो सोन्याचा घोटाळा झाला होता. त्याची कोणालाच पर्वा नाही.
पीएम मोदींनी आशीर्वाद घेतला आणि आम्ही दिला
अनंत अंबानींच्या लग्नात पंतप्रधान मोदींना आशीर्वाद देण्याच्या प्रश्नावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमचे आशीर्वाद घेतले, आम्ही त्यांना दिले. ते आमचे शत्रू नाहीत. आम्ही पंतप्रधान मोदींचे शुभचिंतक आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here