टायगर इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने ग्रीन डे साजरा

(विक्रम लालवणी) प्रतिनिधी पारोळा

पारोळा येथील कासोदा रस्त्यालगत असलेल्या टायगर इंटरनॅशनल स्कूल येथे १३ जुलै रोजी जागतिक ग्रीन दिन निमित्त कार्यक्रम करण्यात आला. यावेळी शाळेच्या आवारात जवळपास शंभर रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार हे होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून फॉरेस्ट ऑफिसर शमाकांत देसले, पोलीस उपनिरीक्षक अमर वसावे, पर्यावरणदुत प्रदीप औजेकर, पर्यावरणदुत राहुल निकम, तुकाराम पाटील, नगरपालिका प्रशासकीय अधिकारी यामिनी जटे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे चेअरमन रविंद्र पाटील यांनी केले, तसेच पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकांनी विद्यार्थ्यांना वृक्ष जतन याविषयी मार्गदर्शन केले, तसेच फॉरेस्ट ऑफिसर देसले यांनी ही विद्यार्थ्यांशी संवाद साधत वृक्ष लावणीपासून जतन पर्यंत धडे दिले. याप्रसंगी टायगर इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष रवींद्र पाटील, संचालिका रूपाली पाटील, प्राचार्य श्रीनिवास राव, अजिम शेख उपप्राचार्य कविता सूर्यवंशी ऍडमिनिस्टेड विश्वास पाटील, विभाग प्रमुख नम्रता बेडीस्कर, वृषाली पाटील, क्लार्क श्रीकांत खैरनार, सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here