जळगाव समाचार डेस्क;
दि. १४ जुलै रोजी सरदार वल्लभभाई पटेल बहुउद्देशीय विकास संस्था जळगाव, (Jalgaon) रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल, युवा विकास फाउंडेशन जळगाव व विष्णू भाऊ भंगाळे मित्र परिवार आयोजित यशवंत गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात दहावी उत्तीर्ण व बारावी उत्तीर्ण असलेल्या १५३० विद्यार्थ्यांचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. पालकमंत्री गुलाबराव देवकर, प्रदेश उपाध्यक्ष काँग्रेस महाराष्ट्र प्रतिभा शिंदे, आय.एम.ए. मा.अध्यक्ष डॉ.ए.जी.भंगाळे, प्रदेश युवा सरचिटणीस धनंजय चौधरी, डॉ.राजेश पाटील, शिवसेना जळगाव जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, वाल्मिक पाटील, प्राचार्य.डॉ.प्रशांत वारके,अनिल झंवर, डॉ.इंदिरा पाटील,डॉ.सागरमल डाकलिया,मा.रजनीश पारधीस, अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल रो.दिनेश थोरात, रो.समर्थ पाटील, संचालक ग.स.सोसायटी मा.महेश पाटील, युवासेना अधिकारी पियुष गांधी तसेच इतर प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात महापुरुषांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विष्णू भंगाळे यांनी केले, समाजाचं देणं लागते या भूमिकेतून कार्यक्रमाच आयोजन गुणवंत विद्यार्थ्यांना यथोचित सन्मान व्हावा ही धारणा भविष्यात गुणवंत विद्यार्थी खूप मोठे व्हावेत या शुभेच्छा दिल्यात, उपस्थित सत्कारार्थींचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर आपल्या मनोगतातून प्राचार्य डॉ. प्रशांत वारके आपला मुलगा प्रेषित वारके याला जेईई या परीक्षेत कुठलाही क्लास न लावता यश कसे मिळवता आले, याचे गुपित सांगितले. तसेच चि.प्रेषित वारके यांनी विध्यार्थाना आपल्या मनोगत व्यक्त करताना ध्येय निश्चित करा तसेच वेळेच्या मागे धावू नका वेळेचे तंतोतंत नियोजन आवश्यक असून स्वतः वर आत्मविश्वास ठेवा यश नक्की मिळेल. तसेच चि.तनय डाकलिया यानेही आपल्या मनोगत व्यक्त केले, जेवढे पर्याय शोधून त्यातून यशस्वी मार्ग काढा सर्वोत्तम होण्याचा प्रयत्न करा, एकांतात एकाग्र होऊन अभ्यास करा. त्याचबरोबर कल्याणी पाटील यांनी एमपीएससी कनिष्ठ अभियंता वर्ग दोन अधिकारी पदी निवड कशी झाली. याविषयी सांगताना अपयशाने खचू नका स्वयंप्रेरित व्हा स्वतः परिश्रम करण्यासाठी प्रेरित रहा तसेच प्रयत्न करणे सोडू नका. हे सांगितले.
आदी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश वारके, रवींद्र रडे, मोहित पाटील, ऋषिकेश सोनवणे, सुदर्शन पाटील, शैलेश काळे, अमोल मोरे, प्रदीप भोई, चेतन पाटील, शुभम निकम, सचिन पाटील, गिरीश कोल्हे, मोहित नेमाडे, निलेश जोशी, पंकज जोशी, पियूष गांधी, महेंद्र पाटील, राहूल चौधरी, अजित चौधरी, प्रवीण पाटील, महेश पाटील, प्रा.डॉ. अतुल इंगळे, प्रा. डॉ. हेमराज पाटील, नेमीचंद येवले, विकी काळे, धवल पाटील यांनी परिश्रम घेतले.