जळगाव समाचार डेस्क;
राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या वतीने आज विधान परिषदेत दोन पैकी दोन जागा जिंकल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शिव कॉलनी स्टॉप येथील मध्यवर्ती कार्यालयाच्या समोर फटाके फोडून व मिठाई वाटून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हा जल्लोष केला. (Jalgaon)
यावेळी अल्पसंख्यांक सेलचे इरफान नूरी, वैद्यकीय महानगराध्यक्ष विकी राजपूत, रा.कॉ युवक उपाध्यक्ष फैजान पटेल, निशांत चौधरी, योगेश भोई यांचेसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.