अमळनेर, जळगाव समाचार डेस्क;
अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथे नववीच्या विद्यार्थ्याचा चक्कर येऊन पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयामध्ये इयत्ता नववीत शिकत असणारा विद्यार्थी घनश्याम जितेंद्र महाजन (15) हा संध्याकाळी शाळेच्या पटांगणात खेळत असताना अचानक चक्कर येऊन पडला. यावेळी शिक्षकांनी त्याला सावरले व स्थानिक डॉक्टरांनी तपासणी करत त्याच्यावर प्रथमोपचार केले व त्वरीत अमळनेर येथे दवाखान्यात भरती केले असता त्यांनी तपासून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठवले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. एम. पाटील यांनी तपासून मृत घोषित केले.
आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.
वडील शेतकरी असल्याने तो शाळेबरोबरच त्यांना शेतातही मदत करीत असे. तो एकुलता एक होता, दरम्यान या घटनेची माहिती मिळताच घनश्यामच्या कुटुंबाने प्रचंड आक्रोश केला. त्याच्या पश्चात आई वडील, आजी आजोबा काका व दोन बहिणी असा परिवार आहे. अमळनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन होऊन मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घनश्याम च्या अचानक जाण्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

![]()




