प्रतिनिधी पारोळा,जळगाव समाचार डेस्क;
पारोळा येथील झिरो वायरमन दिनेश भामरे यांचा म्हसवे शिवारात काम करताना पोल वर शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना दि. 6 रोजी घडली होती. कमी वयात दिनेश भामरे यांचा मृत्यू झाल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त झाली. दरम्यान त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी अनेकांनी सहकार्य दिले आहे. यात प्रथम मा. पालकमंत्री डॉ सतीश पाटील यांनी मदत दिली, तर शहरातील सोशल मीडिया ग्रुपच्या वतीनेही मदतीचे आवाहन करण्यात आले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक दात्यांनी मदतीचा हात पुढे करित मयताच्या वारसांना आर्थिक मदत केली. याप्रसंगी माजी नगरसेवक अरुण चौधरी,विधी तज्ञ तुषार पाटील,पत्रकार अभय पाटील, दीपक अनुष्ठान, ईश्वर ठाकूर , अन्नू महाजन, कैलास महाजन, नवल सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी त्यांच्या कुटुंबाशी चर्चा करताना सदर टीमने विद्युत विभाग व ठेकेदारांकडून मदती बाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. मयत दिनेश भामरे यांच्या लहान मुलांना मदत म्हणून टाइगर इंटरनॅशनल स्कूल येथे शाळे मध्ये पन्नास टक्के सूट देण्यात येणार असल्याचे टायगर स्कूलचे संचालक रवींद्र पाटील यांनी यावेळी सांगितले.

![]()




