4 बहिणींच्या एकुलत्या एक भावाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू…

 

जळगाव समाचार डेस्क;

रावेर तालुक्यातून एक दुखद घटना घडली आहे. तालूक्यातील अजंदे येथे कुलरमध्ये पाणी टाकत असतांना विजेचा धक्का लागल्याने 30 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील अजंदे येथील रहिवासी लक्ष्मण संतोष पाटील (३०) हा तरुण काल दुपारी दीड वाजेच्या सुमारास कुलर मध्ये हंड्याने पाणी ओतत होता, यावेळी कुलर बंद होते. मात्र याच वेळी विजेचा शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाला. याबाबत जीवन बिरपन याने रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रीया वसावे करत आहेत.
वेळीच उपचारासाठी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नव्हते…
सदर घटनेनंतर लक्ष्मण पाटील यास नातेवाईक व ग्रामस्थांनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपलब्ध नव्हते. २० मिनिटांनंतर वैद्यकीय अधिकारी आल्यावर तपासणी केली असता त्यांनी लक्ष्मण मयत झाल्याचे सांगितले. तर लक्ष्मणवर वेळीच उपचार झाले असते तर त्याचे प्राण वाचले असते. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे लक्ष्मणचा मृत्यू झाल्याचा ग्रामपंचायत सदस्य जयेश राजू बिरपन यांनी आरोप केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here