जळगाव समाचार डेस्क;
माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या संकल्पनेतून, आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या नेतृत्वात, आज महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकांच्या निषेधार्थ व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी जळगाव (Jalgaon) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. महायुती सरकारच्या शासनामध्ये शेतकरी बांधवांचे अतोनात हाल होत असून, तो हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नसून खतांचे भाव गगनाला भिडले आहे. तर दुसरीकडे केळी पिक विमाची रक्कम अजूनही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. ज्वारी खरेदी केंद्र सुरू झालेली नाही ती सुरु करावीत, दुधाला भाव मिळावा अशा विविध मागण्या यावेळी करण्यात येत आहेत. यावेळी जळगाव जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. दरम्यान तीनही मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी महाविकास आघाडीतर्फे करण्यात आली.
यावेळी, माजी खासदार उन्मेष पाटील म्हणाले की, गेल्या वर्षी सरकारने शेतकऱ्यांना दूध दर वाढीचे भाव जाहीर केलेले आहे, मात्र त्याचा मोबदला अजूनही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. घोषणा करायच्या मात्र अंमलबजावणी करायची नाही अशी या सरकारची धोरणे या सरकाची आहेत. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर दुधाचे पैसे वर्ग होत नाही व शाश्वत आम्हाला काही मिळत नाही. तोपर्यंत आंदोलन मागे नसल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी धरणे आंदोलनास्थळी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी पालकमंत्री सतीश पाटील, वैशाली सूर्यवंशी, वाल्मीक पाटील, मंगला पाटील, भाऊसाहेब सोनवणे, शरद तळे, विष्णू भंगाळे, सुनील महाजन, जयश्री महाजन, गोपाल दर्जी, गजानन मालपुरे यांच्यासह अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.