धक्कादायक; जळगाव कारागृहात कैद्याची हत्या…

जळगाव समाचार डेस्क;

जळगाव येथे कारागृहातून मोठी बातमी समोर आली आहे. आज पहाटे कारागृहात बंद असणाऱ्या कैद्यांची हत्या झाल्याने संपूर्ण प्रशासन हादरले आहे. काही तरी वादातून हा खून झाल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळचे माजी नगरसेवक रवींद्र बाबूराव खरात (५५) यांची ७ ऑक्टोबर २०१९ रोजी भुसावळात हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली असून ते जळगाव कारागृहात आहेत. दरम्यान, या प्रकरणातील एक आरोपी मोहसीन असगर खान याचे दुसरा आरोपी याच्याशी काल दुपारी भांडण झाले. दुपारपासूनच या दोघांमध्ये धुसफुस सुरू होती. या अनुषंगाने रात्री सुमारे दीड वाजेच्या सुमारास दुसर्‍या आरोपीने याने मोहसीन असगर खान (३४) याच्यावर हल्ला चढवत त्याला गंभीर जखमी केले. असगरला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याला मृत घोषीत करण्यात आले. यानंतर पोलिसांनी शहरभर कडक बंदोबस्त तैनात केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here