(विक्रम लालवाणी),पारोळा प्रतिनिधी
पारोळा तालुक्यातील जिराळी येथे तरूणाचा विजेच्या धक्क्याने (Electric Shock) मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील जिराळी येथील महाविद्यालयीन युवक राकेश रामचंद्र पाटील (21) हा दि. ८ रोजी दुपारच्या सुमारास शेतात काम करीत असलेल्या मजूरांना पिण्याचे पाणी देण्यासाठी गेला असता इलेक्ट्रीक मोटारीचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले.
घरातील एकुलता एक तरुण मुलगा गेल्याने कुटूंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पारोळा पोलिस करीत आहेत.