जळगाव समाचार डेस्क;
एक वर्षापूर्वी राष्ट्रवादी पक्षात उभी फुट पडून पक्ष हा दोन गटात विभागला गेला होता. मात्र लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केल्याने त्यांच्यात पुन्हा उत्साह वाढला होता. त्यात दुग्धशर्करा योग आज जुळून आला. आज केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा दिलासा देत निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि तुतारी चिन्हाला मान्यता दिली आहे.
आज शरद पवार गटाची निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली. यावेळी निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला ही मान्यता दिली. याशिवाय कलम 29 B नुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यापुढे देणगी सुद्धा स्वीकारता येणार आहे.

![]()




