शेतकऱ्यांची विविध योजनांसाठी भटकंती होणे योग्य नाही – आ. चिमणराव पाटील

 

(विक्रम लालवाणी) पारोळा प्रतिनिधी

मतदारसंघातील शेतकऱ्यांना पिक विमा व पी.एम.किसान योजनेबाबत होत असलेल्या भटकंती व गैरसोयीची दखल घेत आमदार चिमणराव पाटील यांनी पारोळा तालुका कृषि अधिकारी दत्तात्रय डमाळे, एरंडोल तालुका कृषी अधिकारी गंभीरे, नायब तहसीलदार एस.के. पाटील, पिक विमा तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर रामोशी, पिक विमा एरंडोल तालुका प्रतिनिधी चेतन पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेतली.
यावेळी पिक विमा धारक ज्या शेतकरी बांधवांनी तक्रारी नोंदविलेल्या असतील त्या सर्व शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा तातडीने लाभ देण्यात यावा, तसेच येत्या १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट अनुदान जमा करण्यात यावे, यासाठी कुठल्याही शेतकऱ्यांची इतरत्र भटकंती अथवा गैरसोय होता कामा नये, यासाठी खबरदारी घेण्यात यावे असे त्यांनी सांगितले.
तसेच पी एम किसान योजनेसंदर्भात शेतकऱ्यांना मोठी गैरसोय होतांना दिसत आहे, सर्व आवश्यक कागदपत्रे पुरविल्यावर सुद्धा या योजनेचा बऱ्याच शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही, त्यासाठी शेतकरी तहसिल कार्यालय, सी.एस.सी सेंटर येथे फेऱ्या माराव्या लागतात, त्यामुळे तातडीने उपाययोजना करून शेतकऱ्यांना होत असलेली गैरसोय कशी दुर होईल यासाठी नियोजन करण्याच्या सुचना आ. चिमणराव पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिल्या. याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख मधुकर पाटील, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष विजु पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here