विज्ञान जगतातील धक्कादाय घटना; वैफल्यग्रस्त रोबोटने संपवले आयुष्य, केली आत्महत्या!

 

आंतरराष्ट्रीय, जळगाव समाचार डेस्क;

अख्ख्या जगाचे लक्ष एका घटनेने दक्षिण कोरियात घडलेल्या धक्कादायक घटनेने वेधून घेतले आहे. हि घटना साधीसुदी नसून विज्ञान जगातला धक्का देणारी आहे. कारण येथे चक्क एका रोबोटने (Robot) आपले आयुष्य स्वतः संपवत आत्महत्या केली आहे. (Suicide) या घटनेने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. (Artificial Intelligence)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मध्य दक्षिण कोरियातील नगर पालिकेत आपली सेवा देणाऱ्या या रोबोटने स्वत:ला जिन्याच्या पायऱ्यांवरून खाली पाडून घेत आपल्या सिस्टिमला बंद पाडले आहे. यामुळे तो पूर्ण निकामी (Dead) झाला आहे. दरम्यान पालिकेतर्फे या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हा रोबो नगर पालिकेच्या कामांमध्ये मदत करायचा. गेल्या वर्षभरापासून हा रोबो गुमी शहराच्या नागरिकांना प्रशासकीय कामांमध्ये मदत करायचा. तो सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत काम करायचा. हा रोबोट लिफ्ट बोलवू शकत होता तसेच एकापेक्षा अनेक फ्लोअरवर ये जा करू शकत होता.

त्याच्यात गडबड असल्यासारखा वाटायचा…
गेल्या आठवड्यात तो शिडीवरून खाली पडला. तो इनअॅक्टीव्ह अवस्थेत होता. याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, तो त्यापूर्वी काहीतरी गडबड असल्यासारखे इकडे तिकडे फिरत होता, जणू तो अस्वस्थ आणि तणावात असावा. यामुळे नेमकी काय परिस्थिती उद्भवली याचा तपास केला जाणार आहे.
रोबोटला निर्माण करणाऱ्या कंपनीने त्याचे सर्व वेगळे झालेले स्पेअर पार्ट एकत्र केले आहेत, त्याने नेमके हे का केले यावर आता संशोधन करण्यात येईल असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हा रोबोट कॅलिफोर्नियाच्या बिअर रोबोटिक्सद्वारे बनविण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here