मुंबई, जळगाव समाचार डेस्क;
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) हि महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून त्याबद्दल आज दिवसभरातून दुसरी मोठी घडामोड विधिमंडळ कामकाजात पहावयास मिळाली. आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वयोमर्यादेची वृद्धी आणि स्वतःची जमीन अश्या दोन अटी दूर केल्या. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अजून एक मोठी घोषणा याबाबत केली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेबद्दल सांगताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या योजनेच्या अर्ज करण्याच्या कालावधीची मुदत हि दोन महिन्यांनी वाढवली आहे.
पूर्वी हि मुदत 1 जुलै ते 15 जुलै होती., मात्र आज ती दोन महिन्यांनी वाढवून म्हणजेच 1 जुलै ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंत करण्यात आली आहे.
दरम्यान अधिवास प्रमाण पत्र नसल्यास जन्मदाखला, 15 वर्षापूर्वीच रेशन कार्ड, मतदान कार्ड, जन्म दाखला,शाळेचे लिव्हिंग हे कागदपत्र ग्राह्य धरण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. लाभार्थी महिलांसाठी जमिनीची अट शिथिल करण्यात आली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांना पावसावर अवलंबून राहून शेतीत पिके घ्यावी लागतात, त्यामुळे कोणावरही अन्याय होऊ नये म्हणून हि अट काढण्यात आली आहे.

![]()




