मुंबई, जळगाव समाचार डेस्क;
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणी वाढतांना दिसून येत आहेत. आर्थिक गुन्हे शाखेकडून कथित शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी विशेष न्यायालयात ‘क्लोजर रिपोर्ट’ दाखल करत अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह बँकेच्या 80 संचालकांना क्लीन चिट देण्यात आली होती. मात्र अजित पवारांच्या क्लीन चिटला ईडीनं (ED) विरोध केला आहे.
ईडीने विशेष न्यायालयात या अहवालाला विरोध करण्यासाठी विशेष न्यायालयात मध्यस्थी अर्ज दाखल केला आहे. EOWने नोंदवलेल्या मूळ गुन्ह्यात अजित पवार यांचं नाव आरोपीच्या यादीत होतं. तर क्लोजर रिपोर्टमुळे आमच्या तपासावर परिणाम होईल, असं ईडीनं म्हटलं आहे. ईडीच्या या अर्जावर लवकरच सुनावणी घेण्यात येणार आहे.

![]()




