बजेट मध्ये महिलांसाठी घोषणांचा पाऊस; महिलांना दरवर्षी 3 सिलिंडर मोफत तर, प्रतिमहिना 1500 रुपये मिळणार…

 

मुंबई, जळगाव समाचार डेस्क;

महाराष्ट्र राज्याच्या पावसाळी अधिवेशनात आज दुसऱ्या दिवशी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. काही कालावधीने विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारचं हे शेवटचं बजेट दिसून येत आहे. या बजेटमध्ये शेतकरी, महिला, विद्यार्थ्यांसाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठ्या घोषणा केल्या. या बजेटमध्ये लाडकी बहीण, अन्नपूर्णा योजना, पिंक रिक्षा या सारख्या योजनांचा समावेश आहे.
या आहेत बजेटमधील महत्वाच्या घोषणा…

  • राज्यातील महिलांना १० हजार पिंक रिक्षा देण्यात येणार आहे.
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत वय 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये प्रदान करण्यात येतील.
  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर करण्यात आली आहे. अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून सर्व महिलांना दरवर्षी तीन सिलिंडर मोफत मिळणार आहे.
  • व्यावसायिक शिक्षणासाठी महिलांना ८ लाख रुपये देण्यात येईल.
  • कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबीयातील मुलींची १०० टक्के फी भरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
  • कापूस, सोयाबीन उत्पादकांना ५ हजारांचं हेक्टरी अनुदान देण्यात येईल. ५ हेक्टरच्या मर्यादेत हे अनुदान दिलं जाईल.
  • गाईच्या दुधासाठी ५ रुपयाचं अनुदान प्रति लिटर देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारकडून १ जुलैपासून हे अनुदान दिले जाईल .
  • वारीला जागतिक वारसा म्हणून घोषित करावा, अशी मागणी युनेस्कोकडे केली आहे. त्यानंतर प्रती ‌दिंडीला २० हजार रुपये देण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here