जळगाव समाचार डेस्क;
उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यात एका क्रूर मातेने आपल्या मुलांना नदीच्या पाण्यात बुडवून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत तीन निष्पाप मुलांचा मृत्यू झाला, ज्यांचे मृतदेह बांबाच्या (लहान कालव्याच्या) काठावर पडलेले आढळले, तर एक मुलगा घटनास्थळी जिवंत आढळून आला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस अधीक्षकांसह मोठ्या संख्येने पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला.
तीन मुलांचा मृत्यू झाला
ही घटना औरैया कोतवाली आणि फाफुंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. फाफुंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अता बरुआ येथील रहिवासी असलेल्या प्रियांकाच्या पतीचा दीड वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. तिला चार मुले होती. सध्या ती तिच्या दिराकडे राहत होती. गुरुवारी सकाळी प्रियंका आपल्या चार मुलांसह घरातून निघाली आणि कोतवाली औरैयाच्या सीमेवर असलेल्या केशमपूर घाट नब्बे येथे पोहोचली. तेथे तिने मुलांना पाण्यात बुडवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, यात चार वर्षाच्या, पाच वर्षाच्या आणि दीड वर्षाच्या निरागस बालकांचा मृत्यू झाला. यानंतर तिने तिघांचेही मृतदेह बांबाच्या (कालव्याच्या) किनाऱ्यावर फेकून दिले, तर सहा वर्षांचा मुलगा कसा तरी वाचला.
प्रियांकाचा दिर तिच्यावर प्रेम करत होता पण मुलांना एकत्र ठेवायला तयार नव्हता. मुलांबाबत दररोज वाद होत होते. घटनेपूर्वी काल सकाळी त्यांचा वाद झाला. सुरुवातीला कुटुंबीयांशी भांडण झाल्याच्या रागातून मुलांची हत्या करण्यात आल्याचे समोर येत आहे. या घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांना दिली, त्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. पोलिसांनी तीन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन प्रक्रिया सुरू केली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी महिला प्रियांकाला ताब्यात घेतले, तर पोलीस या घटनेबाबत मुलाची प्रेमाने चौकशी करत आहेत.