जळगाव समाचार | १६ नोव्हेंबर २०२६
आदिवासी समाजाचे आराध्य दैवत आणि महान क्रांतिकारक जननायक भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती रविवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी भाजप कार्यालय, जी. एम. फाउंडेशन येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी सकाळी १० वाजता खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे (राजूमामा) आणि भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्याची माहिती देत त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाचा आढावा घेतला.
या कार्यक्रमाला उज्ज्वला बेंडाळे, एसटी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दीपक कोळी, संतोष इंगळे, उदय भालेराव, दीपक परदेशी, पितांबर भावसार, महेश चौधरी, नगरसेविका वैशाली पाटील, सागर पाटील, प्रमोद वाणी, चेतन शर्मा, पवन खंबायत यांच्यासह एसटी मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

![]()







