जळगाव समाचार डेस्क;
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठातापदाचा पदभाराबाबतीत रस्सीखेच अजुनही सुरूच असल्याचे दिसून येत आहे. कारण डॉ. सदानंद भिसे यांना अधिष्ठाता पदाचा कार्यभार घेऊन अवघे काही तासच झाले न झाले तोच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालयातर्फे सोमवारी दि. २४ जून रोजी पुन्हा आधीचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांना पुन्हा जळगावच्या अधिष्ठाता पदी रुजू होण्यास सांगितले आहे. त्याच बरोबर डॉ. भिसे यांना पुन्हा परभणी जाण्यासाठी सांगितले आहे.
दरम्यान वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाच्या या निर्णयाकवरून अनेक स्तरातून नाराजी व्यक्त होत आहे. सदर आदेश वैद्यकीय शिक्षण व उच्च द्रव्य विभाग मंत्रालयाचे उपसचिव शंकर जाधव यांनी सोमवारी दि. २४ जून रोजी काढले आहे.