चोरट्यांनी 2 मिनिटांत ATM मशीनच उखडले; पोलिसांनी केला 61 KM पाठलाग…

 

बीड; जळगाव समाचार डेस्क;

बीड जिल्ह्यात चोरट्यांनी एटीएम (Automated Teller Machine) मशिन उखडून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही (CCTV)कॅमेऱ्यात कैद झाली आहे. धारूर, बीड येथे चोरट्यांनी काही मिनिटांतच एसबीआयचे एटीएम मशीन उखडून पिकअप वाहनात नेले. (Crime)
चोरटे एटीएम उखडून ते घेऊन जाण्याच्या पूर्ण तयारीनिशी आले असल्याचे सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. चोरट्यांनी ओळख लपवण्यासाठी तोंडावर मास्क लावले होते. याशिवाय एटीएम उखडण्यासाठी त्यांच्याकडे जाड दोरी होती. प्रथम त्याने एटीएमचा वरचा भाग दोरीच्या सहाय्याने वेगळा केला आणि त्यानंतर दुसऱ्यांदा दोरीचा फास लावून त्यांनी संपूर्ण एटीएम उखडून टाकले.
यानंतर त्याने एटीएमची वायर झटकन कापली, आणि मशीन पिकअप गाडीत टाकली आणि पळून जाऊ लागले. मात्र, तोपर्यंत पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्याने पोलिसांनी सुमारे 61 किलोमीटरपर्यंत पिकअप वाहनाचा पाठलाग केला. त्यामुळे लुटलेले पैसे आणि एटीएम मशीन पोलिसांना परत मिळाले मात्र ते चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here