ढगफुटीमुळे इटानगरमध्ये विध्वंस; अनेक गावांशी संपर्क तुटला…

 

अरुणाचल प्रदेश, जळगाव समाचार डेस्क;

अरुणाचल प्रदेशातील इटानगरमध्ये रविवारी सकाळी विध्वंस दिसून आला. येथे पहाट होताच ढग फुटल्याने सर्वत्र पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. ढगफुटीमुळे (Cloudburst) अनेक ठिकाणी भूस्खलनाच्याही (Landslide) घटना घडल्या आहेत. सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात पाऊस पडत आहे. मात्र रविवारी पावसाबाबत कोणताही अंदाज वर्तवण्यात आला नाही. अशात अचानक ढगफुटीमुळे येथील नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत.

गेल्या काही आठवड्यांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे, मात्र गेल्या दोन दिवसांत स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. रविवारी पावसाबाबत कोणताही अंदाज वर्तवण्यात आला नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ढगफुटीची घटना सकाळी 10.30 च्या सुमारास घडली. त्यानंतर इटानगर आणि आजूबाजूच्या अनेक भागांतून दरडी कोसळल्याच्या बातम्या येत आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग 415 च्या अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
महामार्गावर अनेक वाहने अडकून पडली
राज्याच्या राजधानीतील लोकांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या महामार्गावर अनेक वाहने अडकून पडल्याचे ते म्हणाले. याशिवाय नद्यांच्या काठावर आणि भूस्खलनाचा धोका असलेल्या भागात न जाण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. अधिका-यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ते म्हणाले की, जिल्हा प्रशासनाने सात ठिकाणी मदत शिबिरे उभारली आहेत. याशिवाय मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे. बाधितांना शक्य ती सर्व मदत पोहोचवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here