टोल फ्री हेल्पलाईनमुळे नागरिकांच्या तक्रारींचा होणार घरबसल्या निपटारा महापौर काळे यांची माहिती; पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

 

जळगाव समाचार | १५ जुलै २०२६

 

जळगाव शहरातील नागरिकांना महापालिकेच्या विविध सेवांबाबत तक्रार नोंदविण्यासाठी वारंवार कार्यालयात फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेने टोल फ्री हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. १८०० २३३ ००१५ या क्रमांकावर नागरिक घरबसल्या तक्रार नोंदवू शकणार असून, तिची तत्काळ संबंधित विभागाकडे पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

महापौर सौ. दीपमाला मनोज काळे यांनी ही माहिती देताना सांगितले की, या हेल्पलाईनद्वारे नागरिकांच्या तक्रारींची त्वरित नोंद घेऊन त्या संबंधित विभागाकडे तातडीने पाठविल्या जाणार आहेत. तसेच तक्रारींवर जलद कारवाई करून त्यांचे वेळेत निराकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे.

महापालिकेच्या या उपक्रमामुळे नागरिकांचा वेळ, श्रम आणि खर्चाची बचत होणार असून, प्रशासन अधिक उत्तरदायी, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचा विश्वास महापौर सौ. दीपमाला काळे यांनी व्यक्त केला.

“आपली तक्रार… आमची जबाबदारी!” या घोषवाक्यासह सुरू करण्यात आलेल्या या टोल फ्री हेल्पलाईनचा लाभ शहरातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहनही महापौर सौ. दीपमाला मनोज काळे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here