जळगाव समाचार | १७ मे २०२६
मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, भाजपा युवा मोर्चा महानगर आणि जी. एम. फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली रक्ताची टंचाई लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबविण्यात आला. कोणताही दिखाऊपणा, अनावश्यक बॅनरबाजी किंवा अतिरिक्त खर्च टाळून समाजोपयोगी कार्याला प्राधान्य देत शिबिराचे नियोजन करण्यात आले होते.
ना. गिरीश महाजन यांनी केलेल्या आवाहनाला कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मोठ्या संख्येने नागरिकांनी रक्तदानासाठी सहभाग नोंदवत उपक्रमाला यशस्वी केले. शिबिराचा शुभारंभ जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांनी स्वतः रक्तदान करून केला. यावेळी जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे प्रमुख उपस्थित होते. आमदार भोळे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत वाढदिवस साजरा करण्याची हीच खरी समाजाभिमुख पद्धत असल्याचे मत व्यक्त केले.
शिबिरात माजी महापौर सुनील खडके, आरोग्य सेवक शिवाजी पाटील, पितांबर भावसार आणि यश पांडे यांनी प्रत्यक्ष रक्तदान करून सामाजिक संदेश दिला. तसेच भाजपचे अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यात नगरसेविका उज्वला बेंडाळे, नगरसेवक नितीन सपके, उदय भालेराव, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेविका सुचिता हाडा आणि डॉ. राधेश्याम चौधरी यांच्यासह विविध मान्यवरांचा सहभाग होता.
![]()






