**जळगावात वीरशैव लिंगायत धर्म जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद**
जळगाव, दि. १५ जून २०२५: श्री जे. पलासिद्ध धर्म पीठ, साखरखेर्डा, ता. सिंदखेडा, जि. बुलढाणा येथून परमपूज्य षड्ब्रह्म १०८ सदगुरू सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव शहरात वीरशैव लिंगायत धर्म जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानात सदगुरूंच्या नेतृत्वाखाली वीरशैव लिंगायत बांधवांच्या घरी जाऊन धर्मप्रचार करण्यात आला.
या अभियानात लिंग धारण, विभूतीचे महत्त्व, गुरुदीक्षेचे महत्त्व, शो दीक्षेचे महत्त्व आणि वर्षातून किमान एकदा गुरूंना भेटण्याचे महत्त्व याबाबत बांधवांना मार्गदर्शन करण्यात आले. सदगुरू सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराजांनी स्वतः एकाच दिवशी अनेक घरांना भेटी देऊन धर्मप्रचार केला. यावेळी त्यांनी सांगितले की, गुरुमाऊली महाराष्ट्रातील प्रत्येक लिंगायत बांधवांच्या घरी जाऊन धर्मजागृती करणार आहेत.
या उपक्रमात महात्मा बसवेश्वर लिंगायत समाज बहुउद्देशीय संस्था, जळगावच्या पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. संस्थेचे अध्यक्ष संदीप वाणी, कार्याध्यक्ष विशाल लिंगायत, जितेंद्र आंबेकर, सुनील तोडकर आणि चंद्रकांत आप्पा मिटकरी यांनी पुढाकार घेऊन प्रत्येक बांधवांच्या घरी भेटी दिल्या. या अभियानाला लिंगायत समाज बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, धर्मजागृतीसाठी अशा उपक्रमांचे आयोजन भविष्यातही सुरू राहणार असल्याचे संदीप वाणी यांनी सांगितले.
या अभियानामुळे जळगाव शहरातील वीरशैव लिंगायत समाजात धर्माबाबत जागृती निर्माण झाली असून, समाजबांधवांनी सदगुरूंच्या मार्गदर्शनाचे स्वागत केले.
तरी 12 , 13 ,14 ऑगस्ट 2025 रोजी धर्म जनजागृती अभियान साखरखेडा येथे होणार आहे . तरी संपूर्ण माहिती श्री संदीप बसावे यांच्या माध्यमातून मिळणार आहे . 


![]()



