धक्कादायक; 6 वर्षीय मुलगा नाल्यात वाहिला; अजुनही शोध सुरूच…

 

जळगाव समाचार डेस्क;

आज शहरात पावसाने कमालीचा जोर धरला होता. मात्र याच पावसाच्या धारा पवार कुटुंबीयांसाठी अश्रूच्या आणि दुखाच्या धारा बनल्या आहेत. कारण त्यांचा मुलगा हा पाण्यात वाहून गेल्याने त्यांच्यावर शोककळा पसरली आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.
या संदर्भात माहिती अशी की, राहुल किसन पवार (३२) हे (रा.हरिविठ्ठल नगर, मुळ रा. कुसुंबा ता. रावेर) आपल्या पत्नी, मुलगा व मुलगी यांचेसह येथे वास्तव्यास आहे. ते मोलमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान शनिवारी दुपारी चार वाजता सचिन व त्याची १० वर्षाची बहीण आणि परिसरातील लहान मुलांसह लिंबू तोडायला गेले होते. त्याठिकाणी ते चेंडू खेळायला लागले. खेळताना चेंडू जवळच्या नाल्यात पडला. तो घेण्यासाठी सचिन नाल्यात उतरला. मात्र त्याच वेळी पाऊस आल्याने नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढला आणि तो वाहत्या पाण्यात वाहून गेला. यावेळी लहान मुलांनी आरडाओरडा केली असता नागरिकांनी धाव घेतली. कुटूंबिय देखील धावत आले. नाल्यात उतरुन शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही. सायंकाळी अग्निशमन विभागाचे पथकही त्याठिकाणी दाखल झाले. पण कुठेही थांगपत्ता लागला नाही. रात्री उशिरापर्यंत पोलीस व अग्निशमन विभागाकडून त्याचा शोध सुरु होता. कुटूंबियांचा एकच आक्रोश पाहून अनेकांचेही डोळे पाणावले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here