5000₹ गुंतवा आणि मुलीचं भविष्याबाबत निश्चिंत व्हा; मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी सरकारची प्रभावी योजना…

 

जळगाव समाचार | २५ मे २०२५

भारत सरकारने मुलींच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी सुरू केलेली सुकन्या समृद्धी योजना (SSY) देशभरातील पालकांसाठी एक विश्वासार्ह पर्याय ठरत आहे. ही योजना “बेटी बचाओ, बेटी पढाओ” या राष्ट्रीय अभियानाचा भाग असून मुलींच्या भविष्यासाठी दीर्घकालीन आर्थिक पाठबळ देण्याचा उद्देश घेऊन राबवली जात आहे.

या योजनेअंतर्गत वयाच्या १० वर्षांखालील मुलीसाठी खाते उघडता येते. यामध्ये वार्षिक किमान ₹२५० आणि कमाल ₹१.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. सध्या या योजनेवर ८ टक्के वार्षिक व्याजदर लागू आहे, जो इतर सरकारी बचत योजनांच्या तुलनेत अधिक फायदेशीर मानला जातो.

जर एखाद्या पालकांनी २०२५ साली दरमहा ₹५,००० गुंतवणूक करण्यास सुरुवात केली, तर १५ वर्षांत त्यांनी एकूण ₹९,००,००० गुंतवले असतील. योजना २१ वर्षांनी परिपक्व होते (२०४६ साली), आणि त्यादरम्यान मिळणाऱ्या व्याजासह एकूण मिळकत ₹२६,९३,८१४ इतकी होऊ शकते. ही रक्कम मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा विवाहासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.

योजनेचे प्रमुख फायदे
• फक्त मुलींसाठी खास तयार केलेली योजना
• शिक्षण व विवाहासाठी आर्थिक तयारीस मदत
• सध्या लागू असलेला उच्च ८% व्याजदर
• आयकर कलम ८०सी अंतर्गत करसवलतीचा लाभ
• सरकारकडून संपूर्ण हमी असलेली सुरक्षित योजना

पात्रता अटी
• खाते उघडण्यासाठी मुलीचे वय १० वर्षांपेक्षा कमी असावे
• एका कुटुंबातील दोन मुलींसाठीच ही योजना लागू
• फक्त एका मुलीसाठी एकच खाते उघडता येते

सुकन्या समृद्धी योजना ही मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक दीर्घकालीन, सुरक्षित आणि फायदेशीर आर्थिक गुंतवणूक आहे. शिक्षण, करिअर उभारणी किंवा विवाह अशा गरजांसाठी आवश्यक भांडवल तयार करण्यासाठी ही योजना अतिशय उपयुक्त ठरते. पालकांनी आपल्या मुलीच्या सुरक्षित भविष्यासाठी या योजनेचा अवश्य विचार करावा. अधिक माहितीसाठी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा अधिकृत बँकेत संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here