जळगाव : शिवाजीनगर येथे एकट्याच राहणाऱ्या आजीच्या घरी झोपण्याच्या बहाण्याने जाऊन तिच्या घरातून सुमारे साडेतीन लाख रुपयांचे दागिने आणि वीस हजार रुपयांची रोकड असा एकूण तीन लाख 70 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरलेले दागिने विक्री करण्यासाठी संशयीत योगेश संतोष पाटील (रा. शिवकॉलनी) हा विक्रीसाठी घेवून जाण्यापुर्वी बळीराम पेठ परिसरातून एलसीबीच्या पथकाने त्याला जेरबंद केलं असून त्याच्याकडून चोरलेले दागिने जप्त करण्यात आले आहे.
शहरातील शिवाजी नगरात गोदावरी पंडीत पाटील (वय ८८) या वृद्ध महिला एकट्याच वास्तव्यास होत्या. आहे. दि. २३ ऑगस्ट रोजी त्यांची मुलगी आणि नातू हे त्यांच्याकडे आले होते. घरात झोपलेले असतांना संशयित योगेश पाटील याने घरातील कपाटातून वृद्ध महिलेचे साडेतीन लाख रुपये किंमतीचे दागिने आणि २० हजारांची रोकड असा एकूण ३ लाख७० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता. याप्रकरणी शहर पोलिसात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. वृद्ध महिलेच्या घरातून दागिने चोरीस गेल्याने हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या होत्या. त्यानुसार एलसीबीच्या पथकाकडून संशयिताचा शोध घेतला जात होता.
सापळा चरून घेतले ताब्यात संशयित योगेश पाटील हा चोरलेले दागिने विक्रीसाठी बळीराम पेठ परिसरात फिरत असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली.
त्यानुसार उपनिरीक्षक गणेश वाघमारे, दत्तात्रय पोटे, सफौ अतुल वंजारी, संजयहिवरकर, हरीलाल पाटील, विजय पाटील, रवि नरवाडे, राजेश मेढे, प्रदिप सपकाळे यांनी सापळा रचून योगेश पाटील याला अटक केली.
आजीच्या घरुन चोरलेले दागिने नातूकडून हस्तगत संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर त्याची अंगझडती घेण्यात आली. दरम्यान, त्याच्याकडे चोरलेले दागिने मिळून आले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने हे दागिने आपल्या आजीच्या घरुन चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली. पोलिसांनी ३ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. पुढील कार्यवाहीसाठी त्याला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.