जळगाव समाचार | १३ मे २०२५
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १० वी (SSC) परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यंदा एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.१०% इतकी असून, निकालात गेल्या वर्षीच्या तुलनेत १.७१% घट झाली आहे.
यंदाही मुलींचा निकाल मुलांपेक्षा अधिक लागला आहे.
• मुलींची टक्केवारी: 96.14%
• मुलांची टक्केवारी: 92.31%
285 विद्यार्थी काठावर पास
राज्यातील 285 विद्यार्थ्यांना फक्त 35 टक्के गुण मिळाले असून, ते काठावर पास झाले आहेत.
जिल्हावार तपशील:
• मुंबई – 67
• नागपूर – 63
• पुणे – 59
• संभाजीनगर – 26
• अमरावती – 28
• कोल्हापूर – 13
• लातूर – 18
• नाशिक – 9
• कोकण – 0
१००% गुण मिळवणारे २११ विद्यार्थी
राज्यातील २११ विद्यार्थ्यांनी सर्व विषयांमध्ये १०० टक्के गुण मिळवले आहेत. यात लातूर विभागाने सर्वाधिक ११३ विद्यार्थ्यांसह आघाडी घेतली आहे, ज्यामुळे “लातूर पॅटर्न” पुन्हा यशस्वी ठरला आहे.
जिल्हावार तपशील:
• लातूर – 113
• संभाजीनगर – 40
• पुणे – 13
• कोल्हापूर – 12
• अमरावती – 11
• मुंबई – 8
• कोकण – 9
• नागपूर – 3
• नाशिक – 2
सर्वाधिक व कमी निकाल असलेले जिल्हे
• सर्वाधिक निकाल: सिंधुदुर्ग – 99.32%
• सर्वात कमी निकाल: गडचिरोली – 82.67%
यंदा राज्यभरातून एकूण १५.५८ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षेला १५.४६ लाख विद्यार्थी उपस्थित राहिले होते, आणि त्यापैकी १४.५५ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले.