(विक्रम लालवाणी) प्रतिनिधी पारोळा
पारोळा शहरातील भोसले गल्ली येथील रहिवाशी राकेश आबा मराठे या 24 वर्षीय तरुणाने विषारी औषध सेवन केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक ७ रोजी घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पारोळा शहरातील रहिवासी सतीश खाडे यांनी पारोळा पोलीस स्टेशनला दिलेल्या दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक ७ जुलै रोजी राकेश आबा मराठे (24) रा. भोसले गल्ली ता. पारोळा याने पोपट नगर शिवारातील शेतात काहीतरी विषारी औषध सेवन केल्याची माहिती मिळाली. याबाबत घटनास्थळी राकेश मराठे याच्याजवळ विषारी औषधाची पिशवी पडलेली होती, आणि त्याच्या नाका तोंडातून विषारी औषधाचा वास येत होता. त्यामुळे त्याला लागलीच खाजगी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून सायंकाळी त्यास मयत घोषित केले.
याबाबत पारोळा पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पारोळा पोलीस करीत आहे. दरम्यान २४ वर्षीय युवकाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.