‘घरी जाते’ असे सांगून निघालेली 23 वर्षीय तरुणी फुले मार्केट समोरून बेपत्ता…

 

जळगाव समाचार डेस्क;

फुले मार्केट समोरून बहिणीला चोपडा येथे घरी जाते असे सांगून गुरुवारी निघालेली 23 वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात शनिवारी हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत प्राप्त माहिती नुसार चोपडा तालुक्यातील सुटकार येथे राहणारी शितल समाधान कोळी (23) ही तरुणी मोठी बहीण वैशाली रवींद्र कोळी (रा. वडामळा, जैनाबाद) यांच्याकडे आली होती. ती गुरुवारी दुपारी फुले मार्केट समोरील नूतन ड्रायफूट समोरून घरी जाते असे सांगून गेली. मात्र ती अद्याप घरी पोचलेली नाही. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात शनिवारी हरवल्याची नोंद करण्यात आली असून याप्रकरणी पुढील तपास प्रकाश पाटील हे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here