जळगाव समाचार डेस्क| ३१ ऑगस्ट २०२४
अमळनेर तालुक्यातील कंडारी गावात राहणाऱ्या १८ वर्षीय जयेश देसले या युवकाचा धार येथील पाडसर तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
जयेश बारावीचे शिक्षण मारवड येथील भालेराव पाटील कॉलेजमध्ये घेत होता. काल दुपारी तो आपल्या मित्रांसह तलावात पोहण्यासाठी गेला होता. यावेळी दोन विद्यार्थी थोडक्यात बचावले, मात्र जयेश पाण्याचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. ही घटना सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. स्थानिक गावकरी व पोलिसांनी उशिरापर्यंत शोध घेतला आणि जयेशचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.