Monday, December 23, 2024
Homeजळगाव17 वर्षीय अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या...

17 वर्षीय अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या…

जळगाव समाचार डेस्क;

शहरातील सरस्वती नगर भागातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इयत्ता 12 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. ध्रुव ललित बऱ्हाटे असं मयत मुलाचे नाव आहे. (Suicide)
याबाबत सविस्तर वृत्त असे की, ध्रुव बऱ्हाटे हा तरूण आई, वडील, लहान भाऊ यांच्यासह सरस्वती नगर (भुसावळ रोड, जळगाव) येथे राहत होता. त्याचे वडील एका हॉटेलमध्ये काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, सोबतच आई शहरातील एका सोन्याच्या पिढीत काम करून वडिलांना हातभार लावत. ध्रुव हा इयत्ता बारावी विज्ञान शाखेमध्ये मु.जे. महाविद्यालय येथे शिक्षण घेत होता. गुरुवार २७ जून रोजी सकाळी नेहमीप्रमाणे ध्रुवचे आई-वडील हे कामाला निघून गेले. त्यानंतर सकाळी ध्रुव हा घरी एकटाच होता. त्याने घरामध्ये एका खोलीत स्वतःला गळफास लावून घेत आत्महत्या केली.
लहान भाऊ घरी आल्यावर प्रकरण उघडकीस आले…
दरम्यान दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्याचा लहान भाऊ शाळेतून घरी आला, त्यावेळेला भाऊ दरवाजा उघडत नाही म्हणून त्याने शेजारील नागरिकांना सांगितले. त्यावेळेला परिसरात राहणारे त्याचे नातेवाईक यांनी धाव घेतली. त्यांनी खिडकीतून पाहिले असता ध्रुव हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यानंतर ध्रुव याला दरवाजा तोडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. माधुरी सोसे यांनी तपासणीअंती मयत घोषित केले.
शासकीय रुग्णालयामध्ये नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली होती. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page