जळगाव समाचार | सोमवार, ५ मे २०२५
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल आज जाहीर झाला असून राज्याचा एकूण निकाल ९१.८६ टक्के लागला आहे. यंदाही मुलींनी उल्लेखनीय कामगिरी करत मुलांपेक्षा सरस ठरले आहेत.
यंदा मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९४.५८% इतकी लागली असून, मुलांची टक्केवारी ८९.५१% आहे. त्यामुळे मुलींनी मुलांपेक्षा ५.०७% अधिक टक्केवारी मिळवून आपली आघाडी कायम राखली आहे.
विभागीय निकालात कोकण विभागाने बाजी मारली असून ९६.७४% टक्के निकालासह तो सर्वाधिक यशस्वी ठरला आहे. दुसरीकडे, लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ८९.४६% इतका लागला आहे.
• एकूण परीक्षा दिलेले विद्यार्थी: १५,०५,०३७
• त्यापैकी:
• ८,१०,३४८ मुले
• ६,९४,६५२ मुली
• ३७ तृतीयपंथी विद्यार्थी
• नोंदणीकृत विद्यार्थी: १४.८७ लाख
• एकूण उत्तीर्ण विद्यार्थी: १३ लाख
यंदाचा एकूण निकाल ९१.८६% लागला आहे. मागील वर्षी हा निकाल ९३.३७% इतका होता, त्यामुळे यंदा थोडी घसरण नोंदवली गेली आहे.
विद्यार्थ्यांना आपला निकाल खालील संकेतस्थळांवर पाहता येईल:
1. results.digilocker.gov.in
2. mahahsscboard.in
3. hscresult.mkcl.org
4. results.targetpublications.org
5. results.navneet.com
SMS द्वारे निकाल कसा पाहाल?
‘MHSSC’ असा मेसेज टाइप करा आणि 57766 या क्रमांकावर पाठवा.
डिजीलॉकरवरून डिजिटल मार्कशीट मिळवण्याची प्रक्रिया
1. results.digilocker.gov.in ला भेट द्या
2. मोबाईल नंबर टाका आणि OTP ने व्हेरिफाय करा
3. युजरनेम-पासवर्ड वापरून लॉगिन करा
4. आधार क्रमांक टाकून प्रोफाइल सिंक करा
5. ‘महाराष्ट्र बोर्ड’ व ‘मार्कशीट’ पर्याय निवडा
6. रोल नंबर आणि उत्तीर्ण वर्ष टाकून ‘GET Document’ वर क्लिक करा
गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी महत्त्वाची माहिती
• अर्ज करण्याची तारीख: ६ मे ते २० मे २०२५
• अर्ज फक्त mahahsscboard.in या संकेतस्थळावरून करता येतील
• अट: उत्तरपत्रिकेची छायाप्रती घेणे अनिवार्य आहे
जे विद्यार्थी यंदा अपयशी ठरले आहेत, त्यांच्यासाठी पुढील संधी खालीलप्रमाणे उपलब्ध आहेत:
• जून-जुलै २०२५
• फेब्रुवारी-मार्च २०२६
• जून-जुलै २०२६
या वर्षीही मुलींच्या यशाची कमान उंचावली आहे. शिक्षण क्षेत्रात होणारे सकारात्मक बदल, विद्यार्थ्यांचे परिश्रम आणि पालक-शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच हा यशस्वी निकाल साकारला गेला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि भविष्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!