जळगाव समाचार डेस्क;
चोपडा तालुक्यातील चहार्डी गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 12वीत शिकणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Suicide)
याप्रकरणी प्राप्त माहितीनुसार, लोकेश प्रवीण पाटील (17) चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील खंडू बाबा नगरमधील रहिवासी होता. दि. 9 रोजी घरात तो जात प्रमाणपत्र काढून येतो असे सांगून निघाला, मात्र दि. 10 रोजी झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एका व्यक्तीच्या निदर्शनास आले, त्या माहितीवरून तो लोकश असल्याचे समजल्यावर घरच्यांनी टाहो फोडला. लोकशने नैराश्यातून गावाबाहेरील चोपडी वाट शिवारातील अनुप उदय पाटील यांचा शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. लोकेश याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण, आजी असा परिवार आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

![]()




