Sunday, December 22, 2024
Homeक्राईमराजकीय वादातून नव्हे तर दहशत माजवण्यासाठी केला गोळीबार

राजकीय वादातून नव्हे तर दहशत माजवण्यासाठी केला गोळीबार

जळगाव– मुक्ताईनगर बोदवड मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात असलेले अपक्ष उमेदवारावर मंगळवारी गोळीबार केल्याची घटना घडली होती. गोळीबार करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली असून दीपक दादाराव शेजोळे (वय २२, रा. येवती, ता. बोदवड), आयुष उर्फ चिकू गणेश पालवे (वय १९, रा. नांदगाव, ता. बोदवड) व विक्की ईश्वर गुरचळ (रा. नांदगाव, ता. बोदवड) अशी या तिघांची नावे आहेत. तसेच त्यांचे दोन साथीदार मात्र फरार आहे. ही घटना राजकीय वादातून नव्हे तर केवळ दहशत माजवून उमेदवाराकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न होता, असे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर श्रेड्डी यांनी सांगितले.

मुक्ताईनगर बोदवड मतदार संघातून अपक्ष उमेदवारी करणारे विनोद सोनवणे हे प्रचार करीत असतांना विना क्रमांकाच्या दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी त्यांच्यावर गोळीबार करुन ते पसार झाले होते. ही घटना बोदवड तालुक्यातील राजूर ते नांदगाव दरम्यान घडली होती.

याप्रकरणी अजय राजेंद्र भंगाळे याच्या तक्रारीवरुन बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासचक्रे फिरवित गोळीबार करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले. दरम्यान गुन्ह्यात वापरलेली दुचाकी गोळीबार करणाऱ्यांनी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

पैसे उकळण्यासाठी गोळीबार पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी हा गोळीबार इतर दोन साथीदांच्या सांगण्यावरुन केल्याचे सांगितले. तर, त्या दोघांनी निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवाराकडे पैसे मागितले होते. मात्र त्यांनी प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांना धमकावण्यासाठी त्यांनी गोळीबार केल्याचे उघड झाले.

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page